15 जून पासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य-एक गणवेश’ लागू.

राज्यातील सरकारी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्याचा शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन निर्णय जाहीर केला आहे. परंतु यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

नवीन आदेशानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला आहे. तर उर्वरित दिवशी म्हणजेच मंगळवार, गुरुवार व शनिवार हे तीन दिवस स्काऊट आणि गाईडचे गणवेश निश्चित करण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसात गणवेशावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण शाळा सुरू होण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. अशाप्रकारे आदेशाची अंमलबजावणी जारी केल्याने शिक्षण तज्ञांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाकडून धोरणात अनेक वेळा गणवेशा संदर्भात निर्णय घेण्याबाबतीत बदल केले जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ‘एक राज्य-एक गणवेश’ हे धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा धोरणात बदल करून तीन दिवस नियमित गणवेश तर तीन दिवस स्काऊट गाईड प्रमाणे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *