आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 51 महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 43 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट होती. मे महिन्यात सलग पाच दिवस तापमान 45° पेक्षा जास्त होते.
याचा केळी पिकाला मोठा फटका बसला होता. यंदा सलग तीन दिवस 45 अंश तापमान राहिल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 51 महसूल मंडलामध्ये सलग पाच दिवस 45 अंश तापमान राहिले होते. अशा या मंडलातील केळी उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत.
या अगोदर एप्रिल महिन्यात जास्त तापमान असल्यामुळे 75 महसूल मंडले पात्र ठरली होती. तर कमी तापमानाच्या निकषात 36 महसूल मंडलातील शेतकऱ्यांना 26,500 रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती. या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्ह्यातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
जास्त उष्णतेमुळे केळीची पाने जळाली व फळे ही खराब झाली याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हवामान आधारित पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून हवामान बदलामुळे पीकांना होणाऱ्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते.
शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान-
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी हवामान आधारित पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी विभागाने केले आहे. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकतात.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.