आज आपण सदर लेखातून एक महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात व आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पं
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली व त्यानंतर सोमवारी म्हणजेच आज दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी सर्वात अगोदर पहिला निर्णय हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल घेतला आहे. 17 व्या हप्त्यासाठी 20 हजार कोटी रुपये जारी केले आहेत.
आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व तसेच कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्त्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर आता 17 व्या हप्त्याची वाट शेतकरी पहात होते. ही प्रतीक्षा आता संपली आहे. या योजनेचा लाभ आता 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. पी एम किसान योजनेचा माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात.
या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. हे पैसे दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर व डिसेंबर-मार्च या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या हप्त्याची रक्क्म ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केले जातात.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही त्यांनी काय करावे?-
शेतकरी मित्रांनो जर आपल्याला पी एम किसान योजनेचे थोडे हप्ते मिळाले असतील व त्यानंतर पुढील हप्ते मिळालेले नाहीत. तर त्यासाठी आपल्याला पी एम किसान योजनेची ई-केवायसी करून घ्यायची आहे व त्याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे. हे केल्यास आपल्याला पी एम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळतील.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.