भारत सरकारने 2016 मध्ये आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला 12 अंकी एक युनिक ओळपत्र दिले गेले आहे. 140 करोड भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहेत व ते नागरिक यांचा ओळखपत्र म्हणून वापर करत आहेत.
म्हणून तर आधार कार्ड जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आहे असे म्हटले जात आहे. या आधार कार्ड बरोबर एक मोबाईल नंबर देखील लिंक असतो. जेव्हा आपण सर्वात अगोदर आधार कार्ड बनवत असतो, तेव्हा त्या व्यक्तीने दिलेला मोबाईल क्रमांक त्याचा आधार कार्ड सोबत लिंक केला जातो. परंतु जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल क्रमांक लिंक केला आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर आपण सदर लेखातून ते जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड हे भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला दिलेला नंबर आहे. आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाचे ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यासाठी परंतु त्यासाठी तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर कोणता आहे हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चालू घडीला अनेक मोबाईल कंपन्यांच्या ऑफर्स असतात. त्यामुळे अनेकजण सीमकार्ड हे चांगली ऑफर असेल तर खरेदी करतात आणि जुने नंबर विसरून जातात किंवा भरपूर व्यक्ती एक किंवा दोन तसेच तीन नंबर एका वेळी वापरत असतात. त्यामुळे आपल्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे त्यांना कळतच नाही किंवा ते विसरून जातात. मग अशावेळी काय करायचे ते आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.
आपल्या आधार कार्डची कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसे पाहाया?
- सर्वात आगोदर uidai.gov.in या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- लिंक वर क्लिक केले की तुम्ही आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाताल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.
- नंतर आधार अद्यावत करा, आधार सेवा असे विविध पर्याय दिसतात. त्यातील आधार मिळवा या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर तुमच्या आधार कार्डचा बारा अंकी क्रमांक टाकावा.
- आता त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- आता कॅप्चा भरून सबमिट करावा.
- जर प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला कळवले जाईल.
- तसेच जर तुम्ही टाईप केलेला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर तसे दिसेल.
- अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जाणून घेऊ शकता.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.