शासनाचा मोठा निर्णय! आजच भरा फॉर्म, नवीन अर्ज सुरू.

आज आपण सदर लेखातून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही बातमी शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायद्याची ठरणार आहे. आपले केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी सतत काही ना काही नवीन योजना राबवत असतात.

त्यामधीलच महाडीबीटीवरून शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जात होते. परंतु काही दिवसा अगोदर या पोर्टल वरती अनुदान उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जात नव्हता. परंतु आता यामध्ये अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

या संदर्भातला शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळणार आहे व ट्रॅक्टर अनुदान योजना किंवा इतर शेती संबंधित यंत्रे खरेदी करण्यासाठी कसा अर्ज करावा लागणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत.

शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर केल्याप्रमाणे महाडीबीटीवर 112 कोटी इतका निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता याचा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. जर शेतकऱ्यांनी या अगोदर ट्रॅक्टर अनुदानसाठी व इतर यंत्रणे खरेदी करण्यासाठी अर्ज केला असेल, तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे. अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे ते जाणून घेऊयात.

ट्रॅक्टर अनुदान योजना 2024

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्यासाठी शासनाच्या वतीने महाडीबीटीच्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर इतर अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळत होते. परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे ते बंद होते. आता हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

अनुदान किती मिळणार?

जर शेतकऱ्याला ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये आपल्याला 1.25 लाख किंवा 50% अनुदान मिळणार आहे व इतर अवजारांसाठी काही ठराविक अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी

अर्ज कोठे करावा?

जर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो किंवा आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *