आज लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्यातील मतदान

आज लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्यातील म्हणजेच सातव्या टप्प्यातले मतदान (ता.1) रोजी पार पडणार आहे. यामध्ये आठ राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदार संघात हे मतदान होणार आहे. आज शेवटचा टप्प्यातले मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी (ता.4) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

आज इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 904 उमेदवारांचे भवितव्य बंद होणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघात मोदी यांचा मुकाबला काँग्रेसचे अजय राय यांच्याशी होत आहे.

अंतिम टप्प्यात ज्या अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे, त्यात कंगणा राणावत, रवी किशन, अनुराग ठाकूर, महेंद्रनाथ पांडेय, रविशंकर प्रसाद, निशिकांत दुबे, रामकृपाल यादव, तरणजित संधू, रवणीत सिंह बिट्टू, सीता सोरेन, परनीत कौर (सर्व भाजप), अभिषेक बॅनर्जी, सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), अनुप्रिया पटेल (अपना दल), मनीष तिवारी, विक्रमादित्य सिंह, चरणजित सिंह चन्नी, आनंद शर्मा (सर्व काँग्रेस), मिसा भारती (राजद), हरसिमरत कौर बादल (अकाली दल) यांचा समावेश आहे.

आज उत्तर प्रदेश व पंजाब मधील प्रत्येकी 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहार मधील 8, ओडिशा मधील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंड मधील 3 जागांसाठी तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंडिगडमध्ये मतदान होणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *