हवामान विभागाने मान्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान निर्माण झालेले आहे, त्यामुळे मान्सूनची वाटचाल ही सुरू झाली आहे. तसेच राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून ने आज प्रगती केलेली नाही. परंतु पुढील 24 तासांमध्ये मान्सून प्रगती करण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उद्यापर्यंत मान्सून हा दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा उर्वरित भाग, लक्षदीप आणि केरळ तसेच ईशान्यकडील राज्यात काही भागात व अरबी समुद्रात मान्सून प्रगती करण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
तसेच राज्यातील काही भागात शुक्रवारपासून पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, तर काही भागात उष्णता कायम राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर बीड, जालना व परभणीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच उद्या पुढील तीन दिवस कोकणातील रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गुरुवारी व शुक्रवारी कोकण तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
तर शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व नगर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड व बीड तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला गेला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.