नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशनच्या माध्यमातून शासनाने भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या मिशनच्या माध्यमातून या अगोदर गाय व म्हशींना ईअर टॅगिंग केले जात होते. परंतु आता शेळ्या मेंढ्यांनाही इयर टॅगिंग केले जाणार आहे. पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी देण्यात येणारी औषधे भारत पशुधन प्रणाली मध्ये ई-प्रिस्क्रीप्शनद्वारे देणे गरजेचे आहे.
जी पशुधनासाठी औषधे वापरली जातील, त्यातून त्या भागात संभाव्य साथीच्या रोगांच्या शक्यतेचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे पशुधनाच्या कानात टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाचे लसीकरण, प्रजनन, उपचार, खरेदी-विक्री इत्यादी नोंदी घेतल्यामुळे माहितीचा साठा होईल. त्याचबरोबर पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजनांसह पशुधनाला आवश्यक सेवांचा लाभ देणे शक्य होणार आहे.
त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ईअर टॅगिंगची मोहीम हातात घेतली आहे. मागील तीन वर्षात गाय व म्हैस पशुधनाला ईअर टॅगिंग केले आहे. यातही प्राधान्याने गाय व म्हशींना ईअर टॅगिंग केले आहे तसेच ही प्रक्रिया कायमस्वरूपी चालणार आहे. त्याच बरोबर नव्याने जन्म घेणाऱ्या गाई-म्हशी पशुधनाला टॅगिंग करत रहावे लागणार आहे. त्याचबरोबर आता शेळ्या-मेंढ्यांनाही ईअर टॅगिंग केले जाणार आहे.
त्यामुळे पशुसंवर्धनावरच भार पडू नये म्हणून खासगी दूध संघाचे मनुष्यबळ दूध अनुदानासाठी वापरण्यात आले होते. दूध अनुदानासाठी टॅगिंगला त्यांच्याकडून मदत केली गेली. परंतु आता शेळ्या-मेंढ्यांचे टॅगिंग पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. शिवाय गाय-म्हशीच्या तुलनेत शेळ्या-मेंढ्यांचा प्रजनन कालावधी कमी असल्याने पशुसंवर्धन विभागावर कामाचा अधिक भार पडणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.