अखेर 10 वीचा निकालाची प्रतीक्षा संपली! 27 मे रोजी जाहीर होणार निकाल.

आज आपण सदर लेखातून 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यातील 12 वीचा निकाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. जात कोकण विभागासह मुलींनी बाजी मारलेली दिसून येत आहे.

परंतु आता मात्र 10 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निकालाची प्रतिक्षा लागलेली होती. तर आता 10 वीचा निकाल कधी लागणार आहे, अशी विचारणा होत होती. ती प्रतीक्षा आता संपली आहे. दहावीचा निकाल याच महिन्यात लागणार असून 27 मे रोजी लागणार आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली असून निकाल दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा 10 वीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत पार पडली होती. त्यामध्ये पेपर फुटी व कॉपी होऊ नये म्हणून बोर्डाने विशेष काळजी घेतली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थी बसले होते. 12 वीचा निकाल हा चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. यानंतर आता 27 मे रोजी 10 वीचा निकाल लागणार आहे.

आता त्यामुळे 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे. आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून mahahscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता. परंतु मार्कशीट काही दिवसानंतर दिले जाणार आहे. 12वीच्या परीक्षेत राज्यातील मुलींनी बाजी मारली आहे. आता 10वीच्या परीक्षेत मुली बाजी मारतात की मुले हे पाहण्यासारखे असणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *