आज आपण सदर लेखातून LG द्वारे सुरू करण्यात आलेल्या स्कॉलरशिप योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना वार्षिक स्वरूपात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत LG द्वारे केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अर्जदार विद्यार्थी हा पदवीधर असेल, तर त्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेता येणार आहे. पण जर तुम्ही अजून तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसेल, तरी देखील तुम्ही दुसऱ्या मार्गाने या LG स्कॉलरशिप प्रोग्रॅमचा फायदा घेऊ शकता व तुम्हाला LG द्वारे वर्षाला 1 लाख रुपये देखील मिळतील.
सदर स्कॉलरशिपसाठीची पात्रता-
- अर्जदार विद्यार्थी हा किमान पदवीधर असावा.
- विद्यार्थी हा चालू वर्षात पद्वीचे शिक्षण घेत असावा.
- जर विद्यार्थी हा पदवीच्या पहिल्या वर्षाचा असेल तर त्याला मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत किमान 60% गुण मिळालेले असावे.
- उमेदवार जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पदवी वर्षात शिकत असतील तर त्याला मागील पदवीच्या वर्षात किमान 60% गुण मिळालेले असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा मेहनती, शिकाऊ व हुशार असावा.
- फक्त Buddy4Study व LG Electronics India Private Limited मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- जर जास्त अर्ज करण्यात आले तर केवळ गुणवंत व मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी केवळ ठराविक कॉलेज मधील विद्यार्थी पात्र असणार आहेत, कॉलेजच्या नावाची पहिली लिस्ट प्रसिद्ध झाली आहे, अद्याप दुसरी लिस्ट आलेली नाही.
सदर स्कॉलरशिपचे फायदे-
- या योजनेच्या माध्यमातून पात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी एका वर्षाला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.
- पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्ती रकमेचा वापर फक्त Academic-related expenses साठी करू शकणार आहेत.
अधिकृत संकेतस्थळ- भेट द्या
ऑनलाईन अर्ज- येथून करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 मे 2024
सदर स्कॉलरशिपसाठीचा अर्ज कसा करावा?-
- सर्वात अगोदर वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्यानंतर Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. एकदा नोंदणी करून झाली की मग तुमच्या समोर शिष्यवृत्तीचा फॉर्म येईल.
- त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक व योग्य रित्या भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- सर्वात शेवटी तुम्हाला तुमचा फॉर्म तपासून पाहायचा आहे व त्यानंतर सबमिट करायचा आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.