12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची आज प्रतीक्षा संपणार.

आज आपण सदर लेखातून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतत आलेल्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

याबाबत मंडळाकडून माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच हा निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.

त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून लागलेली निकालाची आतुरता आज संपणार आहे. जरी निकाल हा आज घोषित होणार असला तरी मार्कशीट हे किमान 10 दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. याबाबत बोर्डाकडून माहिती देण्यात आलेली आहे.

निकाल कसा पाहावा?-

  • विद्यार्थ्यांना आपला निकाल हा mahresult.nic.in या साईटवर जाऊन Maharashtra SSC and HSC result येथे क्लिक करावे.
  • त्यानंतर आपला परीक्षा क्रमांक टाकून तो सबमिट करावा.
  • या प्रोसेस नंतर विद्यार्थ्याचा बारावीचा निकाल समोर येईल.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून राज्यातील 9 विभागात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. 12 वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या दरम्यान झाली होती. पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर, कोल्हापूर व अमरावती विभागात ही परीक्षा झाली होती.

पुरवणी परीक्षा कधी घेतली जाणार आहे?-

जे विद्यार्थी पास होणार नाहीत त्यांच्यासाठी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी 27 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबाबतचीए स्वतंत्र माहिती मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *