आरटीईची नवीन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू.

आज आपण सदर लेखातून आरटीईच्या माध्यमातून 25% राखीव जागांसाठी आपल्या पाल्यांसाठी जे पालक प्रवेश घेऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अखेर आरटीईची प्रवेशाची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती प्रसिद्ध केली आहे. 17 मे पासून ते 31 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज या प्रवेशासाठी भरावा लागणार आहेत.

राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारण्याच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवड्याभरानंतर पुन्हा नवीन भरती प्रवेश प्रक्रियेला आज (ता.17) रोजी सुरुवात झालेली आहे. पालकांना शुक्रवारपासून आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.

परंतु या अगोदर ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज भरले आहेत, त्यांना परत नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. आरटीईने प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.

अर्ज करताना पालकांना दहा शाळांची निवड करावी लागणार असून, जर एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळल्यास अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. तसेच अर्जात चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द करण्यास येणार आहे.

नोट-

  • आरटीईच्या 25% जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी 25% अंतर्गत नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *