मका व बी बियाणे शेतकऱ्यांना मिळणार मोफत.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेचा माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बी बियाणे योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावरती वैरण बियाणे, मका व इतर धान्य दिले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया सदर योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्फत 100% अनुदानावरती बी बियाणे पुरवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील ही योजना सुरू आहे.

जर आपल्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. परंतु ही योजना पुणे जिल्ह्यासाठी सुरू आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • 7/12 उतारा
  • विहित नमुन्यातील अर्ज

सदर योजनेचा अर्ज कोणाकडे करावा?-

वरील सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन फॉर्म सोबत कागदपत्रे जोडून द्यावी. त्यानंतर तात्काळ आपणास बी बियाणे वाटप केले जाणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *