आज आपण सदर लेखातून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून बियाणे वितरण अनुदान योजना 2024 संबंधित माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण बियाणे अनुदाना समाविष्ट असणारे जिल्हे कोणते, पिके कोणती, त्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कोठे करावा हे सर्व जाणून घेणार आहोत.
केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून समाविष्ट जिल्हे व पिके-
- भरड धान्य- (मका) सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण 7 जिल्हे)
- गहू- सोलापूर, बीड, नागपूर ( एकूण 3 जिल्हे)
- पौष्टीक तृणधान्ये- ज्वारी, बाजरी, रागी (एकूण 26 जिल्हे)
- भात- पुणे, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, सातारा, गडचिरोली, भंडारा व गोंदिया (एकूण 8 जिल्हे)
- कडधान्य- सर्व जिल्हे
- बाजरी- नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना व उस्मानाबाद ( एकूण 11 जिल्हे)
- ज्वारी- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण 26 जिल्हे)
- ऊस- (छ. संभाजी नगर )- छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड
- कापूस- (अमरावती विभाग)- अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ
(नागपूर विभाग)- वर्धा, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी (एकूण 7 जिल्हे)
- रागी- ठाणे (पालघर समावेत), पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रायगड व रत्नागिरी (एकूण 7 जिल्हे)
(लातूर विभाग)- उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
सदर योजनेची पात्रता-
- ज्या शेतकऱ्याने तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या माध्यमातून कोणत्याही घटकासाठी अर्ज केला असेल, तर त्यासाठी वर दिलेले जिल्हे अनिवार्य आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे गरजेचा आहे.
- जर लाभार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे व जर वृक्ष तेलबियापीक यामधून लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात तेलबिया पिक असणे गरजेचे आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- पूर्वसंमती पत्र
- हमीपत्र
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
सदर योजनेचा अर्ज येथून करा.
WhatsApp Group
Join Now