सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथे पाऊस पाहिला मिळत आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार आहे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने आयएमडीने म्हटले आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
आज (ता.13) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोराचा वारा सुटून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकणात तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी व सोसाट्याच्या वारा सुटून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सांगली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अनेक राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळत आहे?-
सध्या महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर आजही (ता.13) आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडीसा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ व कर्नाटक मध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, केरळ, कर्नाटक, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही हलका पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अनेक भागांमध्ये उकाडा कायम –
जरी राज्यात पावसाचे वातावरण असले तरी काही भागांमध्ये उकाडा देखील कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर या ठिकाणी सर्वात जास्त 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे 40, मालेगाव 41, नांदेड 40.4, परभणी 41.1, अकोला 42.2, अमरावती 41, चंद्रपूर 42, वर्धा 41.5, वाशीम 41.4, यवतमाळ 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.