आज सोमवार (ता.13) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदाना आहे. आज 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना व छत्रपती संभाजी नगर या 11 मतदार संघात मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये 96 जागांसाठी 1717 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी उभे आहेत. आंध्र प्रदेशातील सर्वात जास्त 25 जागांसाठी, तेलंगणा मधील 17 जागांसाठी व उत्तर प्रदेशातील 13 जागांसाठी आज या टप्प्यात मतदान होणार आहे.
तसेच पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशातील प्रत्येकी 8, बिहार मधील 5, ओडिशा व झारखंड मधील प्रत्येकी 4 याशिवाय जम्मू-काश्मीरमधील 1 जागेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एकूण 379 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची सांगता होणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.