उजनी धरणातून भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी सोडले.

उजनी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत 6000 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कारण की सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ सोसावी लागत आहे. त्यानुसार सुमारे पाच टीएमसी पाणी सोडण्यास येणार आहे.

20 मेपर्यंत हे पाणी सोलापूरच्या नजीकच्या औज बंधार्‍यात पोहचणार आहे. धरणातून सकाळी पहिल्या टप्प्यात दीड हजार व त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने 6000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

औज बंधार्‍यातील पाणी तळाला पोहचले आहे. त्यामुळे सोलापूर शहराला पाण्याची टंचाई तीव्र भासत आहे. म्हणून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले गेले आहे. जेणेकरून उजनी धरणातून भीमा नदीच्या बंधाऱ्यात. त्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे ते सोलापूरला पुरवण्यात येणार आहे.

सोलापूर बरोबरच त्या मार्गावरील पंढरपूर, गुरसाळे, उचेठाण, चिंचपूर या भागातील बंधारेही पाण्याने भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे या भागालाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *