चालू घडीला बाजार ज्वारीला हमीभाव अपेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शासकीय खरेदीची मागणी करण्यात येत होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने पणन महासंघामार्फत 1 लाख 36 हजार टन ज्वारी व 100 टन रागी हमीभावाने सरकार खरेदी करणार आहे.
या आदेशानंतर जिल्हास्तरावर आता जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेत पणन विभागाकडून केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती पणन विभागामार्फत दिली गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 2023-24 मध्ये मका, ज्वारी व रागी हे भरड धान्य खरेदीच्या उद्दिष्टाला मंजुरी दिली आहे.
नेमून दिलेले ज्वारी व रागी खरेदीचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य सहकार महासंघ मर्या. मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक या संस्थांना विभागून देण्यात आलेले आहे. याच्यामार्फत खरेदी सुरू करण्यात आली असून 30 जून पर्यंत ती सुरू राहणार आहे.
मका, ज्वारी रागी या सर्व पिकांच्या खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे, असे नागरी पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत. यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी करता येऊ शकते.
ज्वारीची खरेदी ही फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्य सरकारच्या पणन महासंघ व आदिवासी विकास महामंडळाद्वारे केली जाणार आहे. याबाबत ऑफलाईन खरेदी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी ज्यांनी केली आहे त्यांना केंद्र सरकारने ठरवलेल्या दर्जानुसारच धान्याची खरेदी केली जाईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा,. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.