कांदा निर्यात बंदी मागे घेतल्यानंतर तात्पुरती दरवाढ वगळता प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य व 40 टक्के निर्यात शुल्क असणाऱ्या कांद्याच्या भावात पुन्हा घसरण झालेली पाहायला मिळत आहे. कांद्याला प्रति किलो 15 रुपये भाव मिळत आहे, तर निर्यातीसाठी 18 रुपये निर्यात शुल्क निर्यातदारांना मोजावे लागत आहेत.
त्यामुळे कांदा उत्पादक व निर्यातदार संकटात सापडलेले आहेत. ज्या दिवशी कांदा निर्यात बंदी मागे घेतली, त्या दिवशी कांद्याच्या भावात तात्पुरती दरवाढ दिसून आली. त्यानंतर मात्र कांद्याचे दर पुन्हा घटले आहेत. कां
दा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडावे अशी अपेक्षा कांदा उत्पादकांची आहे, परंतु सरकारच्या या निर्णयामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. जरी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा आहे असे सरकार सांगत असले, तरी शेतकऱ्यांच्या खिशातून परत पैसे काढण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे असे शेतकरी नेते म्हणत आहे.
किमान निर्यात मूल्यानुसार निर्यातीच्या कांद्याचा प्रतिकिलो दर 45 रुपये
किमान निर्यात मूल्यानुसार 40% प्रति किलो निर्यात शुल्क 18 रुपये
बाजारातील प्रतिकिलो कांदा दर 15 रुपये
बाजारातील तफावत 3 रुपये
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.