जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी 1 जून पासून “इयर टॅगिंग बंधनकारक”!

जर जनावरांना इयर टॅगिंग केलेले नसेल तर केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा फायदा व लसीकरणाच्या सेवेचा लाभ घेता येत नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता 1 जून 2024 पासून पशुधनाची खरेदी विक्री करण्यास आळा घालण्यात आला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या पशुधनाची नोंद ही ‘भारत पशुधन प्रणालीवर’ असल्याशिवाय शेतकऱ्याला आपल्या जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही.

यामध्ये कोणते कोणते मुद्दे समाविष्ट आहेत?-

नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशनच्या माध्यमातून भारत पशुधन प्रणाली ही कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींसाठी यापुढे इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बाजार समित्यांची जबाबदारी-

इयर टॅगिंग केलेले नसेलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडा बाजार व गावागावातील खरेदी विक्रीसाठी प्रतिबंध लागू करण्यात यावा. तसेच इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजारात खरेदी विक्री होणार नाही याची जबाबदारी संबंधित बाजार समितीने घ्यायची आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून पशुच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची असणार आहे, असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे.

नुकसान भरपाई कधी मिळणार –

शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक मृत पावलेल्या जनावरांना नष्ट केल्यास, त्या जनावराची नोंद ‘भारत पशुधन प्रणालीवर’ असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्यक मिळणार नाही.

जर पशुधनाचे इयर टॅगिंग केलेले नसेल व असे पशुधन नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे इत्यादी कारणांमुळे पशुधनाचा मृत्यू झाला तर अश्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.

जर इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची वाहतूक करता येणार नाही. असे कोणी करताना आढळले तर त्या पशुधनाचा मालकावर व वाहतूकदारावर कारवाई करण्यात येणार आहे, असे सरकारने म्हटले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *