आज आपण सदर लेखातून केंद्र सरकारने काल-परवाच नुकतीच कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे व 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातसाठी जवळपास 40% अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य लागू केली आहे. तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे.
हा कांदा एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत खरेदी केला जाणार आहे. अशी माहिती एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे बोलताना सूत्रांना दिली आहे. या कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडकडून 2.5 लाख टन व एनसीसीएफसाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
या ठिकाणाहून होणार कांदा खरेदी-
शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व रब्बी खरेदी पीएसएफ 2024 साठी एफपीओएस कांद्याची साठवण व उपलब्धता आणि एनसीएफच्या टीमची कांदा खरेदीची तयारी पाहण्यासाठी विशाल सिंग पिंपळगाव बसवंत येथे आले होते.
त्यावेळेस ते म्हणाले की येत्या जून पर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा व गुजरात येथून 5 लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.
या माध्यमातून 50 केंद्र उभारणी-
या कांदा खरेदीचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा कांदा जमा करता यावा यासाठी सुरुवातीला सुमारे 50 केंद्र उघडले जाणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी पेमेंट यंत्रणा ही थेट डीबीटी च्या साह्याने करण्यात येणार आहे.
7 मे पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.