जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांना मिळणार 1400 रुपये!

आज आपण सदर लेखातून जननी सुरक्षा योजनेबद्दलची माहिती जाणून जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकार द्वारे गरोदर महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब घरातील गरोदर महिलांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी, यासाठी त्या महिलेच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने 1400 रुपये पाठवले जातात. त्याचबरोबर त्या महिलेस इतर काही फायदे देखील दिले जातात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेची पात्रता-

  • सदर योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही दारिद्र्यरेषेखालील असावी.
  • त्या गरोदर महिलेचे वय किमान 19 वर्ष असावे.
  • 2 अपत्यांसाठीच या योजनेचा लाभ महिलांना दिला जाणार आहे.
  • ज्या महिलांनी जे JSY Card साठी अर्ज केला आहे, अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे.
  • ज्या महिलांची डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटल किंवा ठराविक प्रायव्हेट मेडिकल सेंटरमध्ये झालेली असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे.

सदर योजनेच्या लाभाचे स्वरुप –

  • ग्रामीण भागात हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली असेल तर 1400 रुपये
  • शहरी भागात हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली असेल तर 1000 हजार रुपये

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • JSY कार्ड
  • डिलिव्हरी सर्टिफिकेट
  • BPL रेशन कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

सदर योजनेचा अर्ज करण्याची पद्धत

  • या योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेचा फॉर्म घेऊ शकता.
  • फॉर्म डाउनलोड करुन झाल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे व त्यानंतर आवश्यक अशी सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरायची आहे. माहिती नमूद केल्यानंतर तुम्हाला वरती सांगितलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत.
  • कागदपत्रे ही Hard Copy मध्ये असावीत. ऑफलाईन अर्ज सादर करताना कागदपत्रे नेहमी Hard Copy मध्ये असणे आवश्यक असतात.
  • सर्वात शेवटी या योजनेचा फॉर्म तपासून बघावा व तो फॉर्म आशा वर्कर किंवा अंगणवाडी केंद्रातील सेविका किंवा पर्यवेक्षक यांच्याकडे सादर करावा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *