आज आपण सदर लेखातून HSC व SSC चा निकाल केव्हा जाहीर होणार आहे याची माहिती पाहणार आहोत. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पेपर संपल्यानंतर आपला निकाल कधी लागणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. बोर्डाच्या वतीने निकाल वेळेत लावण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार आहे?-
25 मे पर्यंत बारावीचा व 6 जून अगोदर दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले आहेत, त्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल असे म्हटले गेले आहे.
यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाख विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी 12 लाख विद्यार्थी बसलेले होते. त्यानुसार इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या 99% गुणउत्तर पत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 85 टक्के गुण उत्तर पत्रिका तपासून झालेल्या आहेत, असा अहवाल बोर्डाने दिला आहे. बोर्डाकडून दररोज उत्तर पत्रिका तपासणीचा अहवाल घेतला जात आहे.
नोट जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.