चालू स्थितीला राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. चालू घडीला सरासरी तापमान 40°c च्या आसपास भरपूर राज्यात आहे. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
यामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान हे 42°c च्या पुढे जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे उष्णतेच्या लाटेमुळे कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यातील मतदान वाढण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. परंतु पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्या टप्प्यातील मतदानाप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अवस्था होईल का अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच ईशान्य भारतात पुढील चार-पाच दिवस 2 ते 3 डिग्री सेल्सिअस तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच सर्वात जास्त तापमान हे महाराष्ट्र मध्ये असणार आहे असे वर्तवले आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील तापमान हे 3 ते 4 डिग्री सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
उष्णतेची लाट कोण कोणत्या राज्यात येणार आहे?-
पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीसा, तमिळनाडू, बिहार, सिक्कीम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व झारखंड
कोणत्या राज्यात 26 एप्रिलला मतदान आहे?-
आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर
दुसऱ्या टप्प्यामधील मतदान हे 89 जागांसाठी होणार आहे. ज्या राज्यात उष्णतेची लाट येणार आहे, त्या अनेक जागांवर दुसऱ्या टप्प्यातील इलेक्शन असल्यामुळे निवडणूक आयोगासमोर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष कसरत करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघ-
अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.