आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जे शेतकरी 5 रुपये दूध अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने दूध अनुदानाची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ केली आहे. म्हणजेच जे वंचित शेतकरी आहेत, त्यांनी 30 एप्रिल2024 पर्यंत आपल्या दूध संघाच्या माध्यमातून ही माहिती भरावी. ही आता शेवटची संधी असणार आहे.
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारच्या ॲप द्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगिग बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांना अडचण निर्माण होत होती. मात्र आता ज्या शेतकऱ्यांना वेळत दुधाची माहिती भरता आलेली नाही, त्यांनच्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. आपल्या दूध संघाच्या माध्यमातून माहिती भरून अनुदानाचा लाभ घ्यावा, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
सदर योजनेची माहिती-
- या योजनेच्या माध्यमातून सहकारी संस्था व संघ व खाजगी दूध संस्थांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाते. ते फक्त 1 महिन्यासाठीच दिले जाणार होते. परंतु शासनाने यामध्ये आणखी कालावधीची मुदतवाढ केली होती .
- मागच्या काही महिन्यांपासून राज्यातील दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले होते.
- म्हणून या योजनेसाठी 34 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधासाठी निश्चित केला गेला होते व प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली होती.
सदर योजनेतील काही बदल-
- ही योजना या अगोदर 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी राबवण्याची मान्यता दिली गेली होती.
- परंतु त्यात परत बदल करण्यात आले व 1 महिना मुदतवाढ देण्यात आली होती. असा जीआर राज्य शासनाने जाहीर केला होता.
- म्हणजेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत सुद्धा दूध अनुदान योजनेचा लाभ मिळणार होता.
- राज्याचे पशुपालन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी 1 महिना मुदतवाढ देण्यात येणार आहे असे जाहीर केले होते.
- म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी असे अशा या दोन्ही महिन्यात गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाणार आहे अशी घोषणा केली होती.
ज्या शेतकऱ्यांनची माहिती भरायची राहिली आहे, त्यांनी लवकरात लवकर आपल्या दूध संघाच्या माध्यमातून माहिती भरून अनुदानाचा लाभ घ्यावा.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.