जर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 1962 अ‍ॅप नोंदणी केली तरच सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांना 1962 अ‍ॅप बद्दलची माहिती देणार आहोत. पशुसंवर्धन विभागाने पशुंसाठी कानाला बिल्ला सक्तीचा करण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एका पत्राद्वारे ‘नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन’ च्या माध्यमातून (एनडीएलएम) ‘भारत पशुधन’ या संगणकीय प्रणालीचा वापर सुरू केलेला आहे. जे शेतकरी खास पशुपालन करतात त्यांना पशुसंवर्धन विभागाकडून आपल्या जनावरांची माहिती अद्यावत करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

सदर अ‍ॅपचे फायदे-

  • सरकारी योजनांचा लाभ हा थेट डीबीटी च्या साह्याने लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.
  • यामुळे खाजगी क्षेत्रात पशुधन व्यवसायात सहभाग वाढेल.
  • यामुळे पशुधन प्रजनन आणि रोग नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.
  • यामुळे OTP प्रणाली द्वारे नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित होते.
  • यामुळे नैसर्गिक आपत्ती व दुष्काळात होणाऱ्या नुकसान भरपाई त्वरित मिळेल.

सदर अ‍ॅपची माहिती-

शेतकऱ्यांनी 1962 अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी व आपल्या जनावरांना बिल्ला लावून घ्यावा. नंतर तुमचा जनावरांची माहिती प्रविष्ट करावी. दुष्काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये संकटात भरपाई देण्यासाठी बिल्ला हा आधार कार्ड ठरणार आहे. त्यामुळे भरपाई रक्कम ही लवकरात लवकर संबंधित पशुधन मालकाच्या खात्यावर जमा होणार आहे. जर पशुधन मालकाने नोंदणीसाठी पुढाकार घेतला तर भविष्यात त्याला कुठल्याही भरपाईच्या मदतीपासून वंचित रहावे लागणार नाही.

भारत पशुधन ॲपची माहिती-

भारत पशुधन ॲपच्या माध्यमातून जनावरांची नोंदी ‘नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन’ द्वारे केली जाते. पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर्स आपल्या कामाचा लेखाजोखा त्याचबरोबर देशातील पशुपालनकांची नोंद करत आहेत. आता पशुधन मालकाला देखील भारत पशुधन अ‍ॅपवर माहिती अपडेट करता येणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत, असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *