आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. 40 तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना व तसेच इतर 1021 महसूल मंडळांतील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत केली जाणार आहे.यासाठी आत्तापर्यंत अनेक वेळा मुदत वाढी देऊन ही 5 लाख 75 हजार 559 विद्यार्थ्यांचीच माहिती बोर्डाकडे प्राप्त झालेली आहे. या विद्यार्थ्यांसाठी 28 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, असे सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे.
माहिती गोळा होण्यास विलंब-
राज्यातील 40 दुष्काळी तालुके व 119 तालुक्यातील 1021 महसूल मंडळ दुष्काळग्रस्त परिस्थितीत आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. मात्र विद्यार्थ्यांची माहिती गोळा होण्यास उशिर झालेला आहे. बोर्डाने वारंवार सूचना करून ही व अनेक वेळा मुदतवाढ करुन ही आतापर्यंत अद्याप पूर्ण विद्यार्थ्यांनची माहिती गोळा झालेली नाही. त्यामुळे आता काही दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
आतापर्यंत मिळालेली माहिती-
इयत्ता दहावी- 3 लाख 37 हजार 44 विद्यार्थी
इयत्ता बारावी- 2 लाख 38 हजार 515 विद्यार्थी
एकूण- 5 लाख 75 हजार 559 विद्यार्थी
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही लाभ दिला जाणार आहे-
दुष्काळी भागातील विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ दिला जाणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाकडे पाठवली गेली आहे. दुष्काळी विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करण्यासाठी शासनाने आतापर्यंत 8 कोटी 90 लाख रुपये बोर्डाला दिले आहेत. मात्र 28 कोटी रुपयांची अजून आवश्यकता आहे, असे बोर्डाने शासनाला सांगितले आहे व आपणास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
अद्याप विद्यार्थ्यांना याचा लाभ का मिळालेला नाही-
अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शुल्क माफ करून द्यावे अशी मागणी बोर्डाने 2023-24 चा आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यास मान्यता देण्यासाठी व उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणते ही उत्तर मिळालेले नाही.
विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती-
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ विद्यालयात जाऊन संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला जाऊन भेट द्यावी.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.