आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पीएम किसान सन्माननिधी योजना ही प्रधानमंत्री मोदी यांनी 2019 मध्ये सुरू केली आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु हे 6000 शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिले जातात.
पी एम किसान सन्मान निधी योजना 17 वा हप्ता कधी मिळणार-
या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात 6000 रुपये दिले जातात व त्याचे वाटप तीन हप्त्यामध्ये केले जाते. म्हणजेच या योजनेचा दर चार महिन्यांनी 2000 हजार रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या माध्यमातून एकूण आतापर्यंत 16 हप्ते जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना आता 17 व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. लोकप्रियता पाहता महाराष्ट्र राज्यातील वर्तमान शिंदे सरकारने या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
नमो शेतकरी योजनेचा 4 था हप्ता केव्हा मिळणार?-
या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेसारखेच आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 3 हप्ते दिले गेले आहेत व शेतकऱ्यांना 4 था हप्ता केव्हा मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे.
नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता व पी एम किसान सन्मान निधी योजना 17 वा हप्ता सोबतच मिळणार का?-
पी एम किसान सन्मान निधी योजना मागील 16 वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच दिला गेला होता. म्हणजेच मागील हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 6000 हजार रुपयांचा लाभ दिला गेला होता. त्यामुळे नमो शेतकरीचा 4 था हप्ता व पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता दोन्हीही बरोबर दिले जाऊ शकतात. असा दावा केला जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाऊ शकतो. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच पीएम किसान योजनेचे 2000 व नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार असे एकूण 4000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.