शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीचा वाद मिटवण्यासाठी सरकारने सलोखा योजना सुरू केली आहे.

आज आपण सदर लेखातून सलोखा योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीचा वाद मिटवला जातो. तसेच समाजामध्ये सलोखा निर्माण केला जातो.

सदर योजनेचे फायदे-

  • या योजनेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष चाललेल्या शेतजमीचा ताबा आणि वहिवाटीबाबतचा वाद मिटवला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क यात सवलत दिली जाते.
  • या योजनेमुळे न्यायालयातील वादांची संख्या कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर भूमाफियांचा हस्तक्षेप टाळण्यास मदत होते.
  • या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होण्यास मदत होते.

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  • ही योजना फक्त शेत जमिनीसाठी लागू आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतजमिनीच्या अदलाबदलीला किमान 12 वर्षे पूर्ण झालेले हवे.
  • एकाच गावामध्ये राहणाऱ्या व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतची नोंद ही तलाठी ग्रामपंचायत मध्ये असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या दस्तामध्ये अधिकारी अभिलेखात वर्ग शेरा समावेश केला असणे आवश्यक आहे.
  • पहिल्या शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा हा पहिला शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये किती फरक आहे याची नोंद असणारे या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची मोठी मालमत्तेची चार चाकी गाडी नसावी.
  • या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय जमातीतील नागरिकांना देण्यात येणार आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

सदर योजनेचा अर्ज कसा करावा –

  • या योजनेचा अर्ज तलाठ्याकडे जाऊन साध्या कागदावर करावा.
  • अर्जामध्ये सर्वे नंबर, चतुर सीमा, गट नंबर आणि इतर आवश्यक माहिती द्यावी.
  • या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या पंचनामाच्या वेळेस दोन सज्ञान साक्षीदारांची उपस्थिती असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या दस्त नोंदणीसाठी दोन्ही गटातील सर्व सहभागी शेतकऱ्यांची संमती असणे आवश्यक आहे.
  • सलोखा योजना फक्त दोन वर्षासाठी लागू राहणार आहे, याची नोंद घ्यावी.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *