आपल्या राज्यातील शेतकरी हे नैसर्गिक रित्या झाडांवर आंबे पिकवत असतात; परंतु एकदा व्यापाराच्या हातात आंबा गेल्यानंतर किंवा किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच केमिकल युक्त प्रक्रिया केला जातात.
काही आंब्यांना गुणवत्ता नसली तरीही ते केमिकलने पिकवले जातात व त्याचे मूल्यवर्धन केले जाते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांना मोठा फटका बसतो. परंतु यामुळे काही वेळा ग्राहक शेतकऱ्यांना दोष देत असतात. चला तर मग जाणून घेऊया केमिकल विरहित आंबा कसा ओळखावा?
केमिकल विरहित आंबा कसा ओळखावा?-
- जर ग्राहकांना शक्य असेल तर आंबा खरेदी करताना एक पाण्याने भरलेली बादली घ्यावी व त्यात तो आंबा टाकून पाहावा. जर आंबा त्या बादलीत टाकल्यानंतर पाण्यात बुडन खाली जात असेल तर असा आंबा हा नैसर्गिक रित्या झाडावर पिकलेला असतो. त्याचबरोबर आंबा हा बादलीच्या पाण्यावर तरंगत असेल तर तो आंबा केमिकलने पिकवलेला असतो.
- जे आंबे केमिकलने पिकवले आहेत, ते आंबे पिवळे आणि हिरव्या अशा दोन रंगांमध्ये दिसून येतात. म्हणजेच अशा दोन रंगाचे डाग आंब्यांवर पाहायला मिळतात. जर आंबे हे नैसर्गिक रित्या पिकवलेले असतील तर संपूर्ण एकसारखा पिवळा रंग येतो. म्हणजेच आंब्याच्या रंगावरून देखील आपण आंब्याची ओळख करू शकतो.
- जेव्हा आपण झाडाला पिकलेला नैसर्गिक रित्या आंबा मधोमध कापतो, तेव्हा आंब्याच्या पूर्ण पल्प व सालीचा रंग एकसारखा असतो. तसेच जर आंबा मधोमध कापल्यानंतर सालीचा रंग आणि आंब्याच्या पल्पचा रंग यामध्ये फरक दिसत असेल, तर असा आंबा केमिकलच्या मदतीने पिकवलेला असतो.
- चवीच्या माध्यमातून देखील आपणास आंबा नैसर्गिक किंवा केमिकलने पिकवलेला आहे हे समजते. केमिकलने पिकलेला आंबा हा थोडासा कडवट लागतो किंवा त्याची चव ही जळालेल्या पदार्थासारखी भासते. नैसर्गिक रित्या पिकलेल्या आंब्याची गोडी केमिकलने पिकलेल्या आंब्यापेक्षा खूप अधिक असते. तसेच केमिकल युक्त आंबा खाल्ल्याने पोटाचे विकार, गळ्यात जळजळ, पोट दुखणे किंवा डायरिया देखील होतो. कारण आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि इथीलीन पावडरचा वापर केला जातो.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now