प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना माहिती 2024

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे यांना घेता येऊ शकतो.

सदर योजनेची उद्दिष्टे

  • या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन दिली जाते. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते.
  • या योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वालंबी व सशक्त बनण्यास मदत मिळते.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आयुष्य जगण्यासाठी दुसरा कसलाही सहारा नसतो. त्यामुळे ही योजना सर्व गरीब आणि मजुरांना प्रतिमहा 3,000/- रुपयांपर्यंत पेन्शन म्हणून आर्थिक मदत देते.
  • या योजनेच्या माध्यमातून ज्या कामगारांना निश्चित उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध नाही त्यांना दिलासा मिळाला आहे.

सदर योजनेचे लाभ-

  • या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर प्रतिमहा 3,000/-  रुपये इतकी पेन्शन दिली जाते.
  • लाभार्थ्याची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रक्कम वर ठरवली जाते. त्या लाभार्थ्यांनी जेवढी योगदान रक्कम भरली असेल, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करते.
  • जर लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून पेन्शन घेताना मरण पावला तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या 50% रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाते. म्हणजेच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला 1,500/- रुपये प्रति महिना मिळते.

सदर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?-

  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • पशुपालक आणि दगडाच्या खाणीमध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे
  • कोळी
  • पशुपालक
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • स्थलांतरित मजूर
  • विणकर
  • सफाई कामगार
  • भाजी आणि फळ विक्रेता
  • घरगुती कामगार

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्ष यादरम्यान असावे.
  • अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा आयकर भरणारा नसावा.
  • सरकारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे जे सदस्य आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • मतदान कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

सदर योजनेचा अर्ज कसा करावा

  • जे कामगार या योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आपल्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र मध्ये सर्व कागदपत्रांसह जावे.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याकडे द्यावी.
  • नंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रम योग मानधन योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरेल.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट तुम्हाला दिला जाईल. या अर्जाची प्रिंट आऊट तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

सदर योजनेचा हेल्पलाइन नंबर-

अधिक माहितीसाठी पुढील नंबर वरती संपर्क करावा.1800 267 6888

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *