घरबसल्या मोबाईलवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही ते फक्त 2 मिनिटांमध्ये पहा

आज आपण सदर लेखातून घरबसल्या मोबाईल मोबाईलच्या साह्याने आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे अगदी 2 मिनिटांमध्ये कसे पाहावे हे जाणून घेणार आहोत.

आपले नाव मतदान यादीत आहे की नाही पाहण्याची प्रक्रिया-

  • जर आपले किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वात अगोदर Play Store वर जाऊन Voter Helplin हे ॲप डाऊनलोड करावे.
  • या अ‍ॅप ची लिंक खाली दिली आहे. तिथून आपण हे ॲप डाऊनलोड करू शकता.
  • हे ॲप ओपन झाल्यावर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे. जर या अगोदर आपण हे अ‍ॅप वापरले असेल तर फक्त लॉगिन करायचे आहे किंवा नवीन असाल तर रजिस्ट्रेशन न्यू या पर्यायावर क्लिक करावे व आपले रजिस्ट्रेशन लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्यासमोर अ‍ॅप ओपन होईल. तेथे वरती Searching ऑप्शन मध्ये search your name in electro roll या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर चार पर्याय येतील-
  1. मोबाईल क्रमांक टाकून मतदान यादीत नाव पाहणे.  
  2. आपल्या मतदान कार्ड वरील QR कोड स्कॅन करून मतदान यादीत नाव पाहणे.
  3. आपली डिटेल टाकून मतदान यादीत नाव पाहणे.
  4. आपला मतदान कार्ड वरील नंबर टाकून मतदान यादीत नाव पाहणे.
  • त्यानंतर या चार पैकी एका पर्यायावर क्लिक करून तेथे आपली माहिती भरून घ्यावी किंवा मोबाईल नंबर टाकून प्रोसिड या ऑप्शनवर क्लिक करावे.  यानंतर आपणास आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे दिसेल. जर आपले नाव मतदान यादीत असेल तर आपल्यासमोर आपली लिस्ट येईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Voter Helpline app डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *