भारताने श्रीलंका, यूएईला कांदा निर्यातीला दिली परवानगी

भारताने श्रीलंका, यूएईला प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने(DGFT), मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताने नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड(NCEL) मार्फत श्रीलंका आणि यूएईला कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

या अगोदर 24,400 टन कांद्याची निर्यात झाली होती. भारतातून कांदा निर्यात करण्यावर बंदी ही 8 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात आली होती व ती 31 मार्च 2024 पर्यंत राहणार होती. परंतु अनियमित हवामान आणि पुरवठ्याच्या समस्यांमुळे सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात कांद्याचा निर्यातीवर मर्यादा घातल्या.

तसेच इतर राष्ट्रांनी देखील विनंत्या केल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या परवानगीनेच कांदा निर्यातीला परवानगी दिली जाईल. कांदा निर्यातीमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *