पशुपालन लोन योजना माहिती 2024

जे लोक पशुपालन करतात त्याच्यासाठी आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत पशुपालन लोन योजना राबवली जात आहे. तेही फक्त 1% व्याजदरात. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला गाई खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी या योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेची माहिती-

या योजनेच्या माध्यमातून बँक पशु खरेदी करण्यासाठी म्हणजेच गाई खरेदी करण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये एवढी रक्कम देते. ही रक्कम आपणास किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुधन खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. लवकरच ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी व पशु पालन करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • सरकारी किंवा खाजगी डेरीला दूध पूर्वीत असल्याचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

सदर योजनेसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया-

  • आपण आपल्या गावातील खाजगी दूध डेरी किंवा पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी जाऊन गाई खरेदी करण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत कर्ज मागणीसाठी अर्ज भरायचा आहे.
  • हा अर्ज भरून झाल्यानंतर पशुवैद्यकीय दवाखाना यांच्यामार्फत किंवा गावातील खाजगी दूध संकलन केंद्रामार्फत बँक मध्ये दिला जातो.  
  • नंतर आपल्याला बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *