मोठी बातमी! RTE प्रवेशाला सुरुवात. 16 ते 30 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत.

प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार(RTE) 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी बालकांच्या पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्यात येतात.

राज्य सरकारने यावर्षी आरटीईच्या मार्फत 25% राखीव जागावर प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले आहेत. नवीन बदलानुसार सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खाजगी शाळा असेल तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही. त्यानुसारच आता राज्यात ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर प्रवेश प्रक्रियेच्याअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम देखील जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये असे जाहीर करण्यात आले होते, की संबंधित पालकाच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वंयअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत या त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिला जाईल.

दरवर्षी आरटीई मार्फत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत पालक असतात. परंतु यावर्षी या प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातील त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक चिंतित झाले होते. परंतु शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया आता जाहीर केली आहे.

या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आज पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी घोषणा करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी पालकांना 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

नोट-

  • ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी आरटीई पोर्टला भेट द्या.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *