पुणे जिल्ह्यातील 11 धरणांमध्ये एकदम थोडासा पाणीसाठा शिल्लक

वाढत्या उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. अनेक बंधारे, तलाव कोरडे पडू लागले आहेत. 11 धरणे कोरडी पडल्यामुळे नागरिकांनवर पाण्यासाठी वन वन फिरण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे टँकरची मागणीत वाढ दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे. सरासरी पाहता एप्रिल महिन्याच्या मध्यावरच भरपूर धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणामध्ये फक्त 20% म्हणजेच 41.16 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यात पाण्याची टंचाई भीषण भासण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण 26 धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर हा शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांसाठी होतो. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होत चाललेली आहे.

गेल्यावर्षी या काळात धरणामध्ये एकूण 66.59 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीचा तुलने चालू वर्षे पाणी साठ्यात जवळपास 13 टक्क्यांनी घट झालेली दिसून येत आहे. टेमघर, कासारसाई, वडीवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये थोडासाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला, चासकमान, वीर, डिंभे, घोड या धरणातून डाव्या आणि उजव्या अशा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झालेली आहे.

सध्या स्थिती पाहता मुठा खोऱ्यातील चार धरणात अवघ्या 10.36 टीएमसी म्हणजेच 35% पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये 12.69 टीएमसी म्हणजेच 26% पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी खोऱ्यातील धरणामध्ये 6.88 टीएमसी म्हणजेच 19% पाणीसाठा उपलब्ध आहे.

इतर जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती-

कोकण- 46.86%

अमरावती- 46.51%

नागपूर- 44.44%

छत्रपती संभाजीनगर- 16.74%

पुणे- 31.39%

नाशिक- 34.64

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *