मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलतीमुळे हजारो महिला मालकीण बनल्या आहेत.

घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलतीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचा फायदा हजारो महिलांच्या नावाने घर खरेदी करण्यासाठी झाला आहे व त्याचबरोबर यातून कोट्यावधी रुपयांची बचत देखील झाली आहे. महिलांनच्या नावे मालमत्तेची खरेदी ही फारच कमी होते.

वडीलोपार्जित मालमत्तेमध्येही महिलांना हिस्सा कमी मिळतो किंवा त्यासाठी त्यांना भांडण करावे लागते असे नेहमी निदर्शनास येते. राज्य शासनाने घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलतीचा निर्णय घेतला आहे कारण महिला घराची मालकीण बनावी यासाठी. त्याचबरोबर महिलांचा योग्य सन्मान राखण्यासाठी व त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

ज्या नागरिकांनी महिलेच्या नावे घर खरेदी केले आहे, त्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाते. मात्र ही सवलत घेतलेल्या महिलेला दस्त नोंदणी पासून पंधरा वर्ष कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुषाला ते घर विकता येणार नसल्याची अट घालण्यात आलेली होती.

जर या योजनेच्या माध्यमातून घर खरेदी केले तर त्या महिलेस आर्थिक अडचण आल्यास ते घर विकता येत नव्हते. जर याचे उल्लंघन झाले तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दंड आकारण्यात येत होता. ही जाचक अट रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली जात होती.

सरकारने या जाचक अटीतून महिलांची सुटका केली आहे. त्या आता आपले घर कधीही आणि कोणत्याही व्यक्तीला विकू शकतात. 31 मार्च 2021 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कार्यकाळात शहरातील 1,336 महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यात आलेली आहे. यामुळे 19 कोटी 9 लाख 39 हजार 483 रुपयांची बचत होण्यास मदत झाली आहे. अशी माहिती मुद्रांक नियंत्रक तानाजी गंगावणे यांनी सांगितलेली आहे.

त्याचबरोबर ग्रामीण मध्ये ही 79 महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यात आलेली आहे व या माध्यमातून 21 लाख 7 हजार 567 रुपयांची बचत होण्यास मदत झाली आहे, असे ग्रामीण सहजिल्हा निबंधक एस. ए. तरासे यांनी सांगितले आहे.

सध्या स्थितीला जर राज्यात घर खरेदीचा व्यवहार करायचा असेल तर त्या दस्त नोंदणीवर 7% मुद्रांक शुल्क आकारला जातो. महिलेच्या नावे घर खरेदी केले तर एक टक्के मुद्रांक शुल्क आकारला जातो. त्याच बरोबर पुरुषांवर अवलंबून असलेल्या महिलांना सुरक्षा मिळण्यासहीया योजनेच्या माध्यमातून मदत झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुरुषही आपल्या कुटुंबातील महिलेच्या नावावर घर विकत घेत आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *