मे जून मध्येही राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

सध्या स्थितीला राज्यात पाऊस, ऊन आणि उकाडा अशा वातावरणाची संमिश्र स्थिती जाणवत आहे. त्याचबरोबर एप्रिल ते जून या दरम्यान तापमान उच्च राहण्याचा अंदाज आहे. या तापमानाचा परिणाम हा शेती आणि आरोग्यावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तापमानाची स्थिती नेमकी कशी असणार आहे.

मान्सूनचा पहिला अंदाज एप्रिलच्या मध्यात दिला जातो. तो हवामान विभागाच्या कार्यशैलीनुसार देण्यात येतो. तसेच दुसरा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो. हा अंदाज देशातील मुख्य चार भौगोलिक भागानुसार वर्तवला जातो जसे की उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य भारत आणि पश्चिम भारत. यानुसार पाऊस कसा असेल, पावसाचे वितरण कसे असेल याचा प्राथमिक अंदाज दिला जातो.

राज्यात तापमान कसे राहील?

भारतीय हवामान विभागाने एप्रिल, मे आणि जून महिन्यातील तापमानाचा अहवाल दिला आहे. या तीन महिन्यांमध्ये दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच दिवसाचे कमाल तापमान आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा बहुतांश ठिकाणी जास्त राहण्याचा अंदाज आहे.

तापमान कसे मोजले जाते?

हवामान विभागाकडे सर्व भारतातील तापमानाच्या अनेक वर्षांची नोंद असते. जेव्हा असे म्हटले जाते की, सरासरीपेक्षा त्या भागात तापमान जास्त आहे. उदा. मागच्या 30 वर्षातील पुण्याचे कमाल तापमान आजच्या दिवशी 34 अंश असेल व आज 36 अंशाची नोंद झाली असेल तर हवामान विभाग म्हणते की पुण्यातील तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी जास्त आहे.

एप्रिल ते जून महिन्यात पाऊस पडण्याची किती शक्यता आहे?

हा कालावधी मान्सून काळ समजला जातो. राज्यातील हवामानाचा 30 वर्षाचा आढावा घेतल्यानंतर राज्याची क्लायमेटॉलॉजी ठरवली जाते. या काळात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. यंदाही एप्रिल ते जून काळात पाऊस पडू शकतो. परंतु हा पाऊस कधी पडू शकतो, कोणत्या भागात पडू शकतो याचा अंदाज हवामान विभाग वेळोवेळी देईल.

एप्रिल महिन्यात देखील ऊन जास्त राहण्याची शक्यता आहे का?

एप्रिल महिन्यात देखील दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये एप्रिल महिन्यात तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता अधिक आहे. त्या तुलनेत विदर्भात ही शक्यता कमी राहणार आहे. परंतु विदर्भातही ऊन जास्तच राहणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *