वयोवृद्ध व दिव्यांग आता करू शकणार घरूनच मतदान?  

यावर्षी निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे अर्ज केले आहेत अशा 1,554 मतदारांना घरूनच मतदान करता येणार आहे. शुक्रवारी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा येथे पहिले मतदान झाले.

ज्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे 12 ड नमुना भरून परवानगी मागितली त्यांच्यासाठी जागेवरच तात्पुरते मतदान केंद्र तयार केले जाणार आहे. 20 एप्रिलपर्यंत बॅलेट मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला पोलिंग पार्टी तयार करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये दोन पोलिंग अधिकारी, एक सूक्ष्म निरीक्षक, एक व्हिडिओग्राफर, एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांचे पथक तयार करण्यात आलेले आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.

मतदाराला बॅलेट पेपर देऊन त्याच्यावर एकाच उमेदवाराच्या नावासमोर टीक करायची आहे. जे शासकीय कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत, त्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे. यावर्षीही 1,545 कर्मचाऱ्यांना ही सुविधा देण्यात आलेली आहे. मतपत्रिका वाटप करण्यात आल्या असून, मतदान करून त्या स्वीकारल्या जाण्यास देखील सुरुवात झाली आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *