प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना महाराष्ट्र

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • ही योजना व्यवसायिकांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देते.
  • या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून कमी व्याजदराने उद्योजकांना कर्ज देण्यात येते.

सदर योजनेचे तीन प्रकार-

  1. शिशु मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून व्यवसायिकाला 50 हजार रुपया पर्यंतचे कर्ज दिले जाते.
  2. किशोर मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत व्यवसायिकांना कर्ज दिले जाते.
  3. तरुण मुद्रा लोन योजना- या योजनेच्या माध्यमातून 5 लाख ते 10 लाख रुपये कर्ज दिले जाते.

सदर योजनेचा व्याजदर व अटी-

  • प्रत्येक बँकेनुसार कर्जावरील व्याजदर व अटी बदलू शकतात.
  • मुद्रा लोन कर्ज योजनेचा व्याजदर हा कमीत कमी 12% एवढा आहे.
  • ईएमआयच्या स्वरूपात मुद्रा लोन कर्ज 3 ते 5 वर्षात परत करावे लागते. हा कालावधी व्यवसायिकाच्या मागील क्रेडिट स्कोरवर ठरवला जातो.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • व्यवसायासाठी भरलेला पूर्ण अर्ज
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • रहिवासी पुरावा
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत-

  • सर्वात अगोदर मुद्रा लोन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर Apply Now या पर्यायावर क्लिक करावे.
  • तेथे दिलेल्या Option पैकी कोणताही एक पर्याय निवडा.
  • नंतर नोंदणी करून घेण्यासाठी तुम्हाला विचारलेली आवश्यक माहिती भरावी.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म Open होईल.
  • त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी. त्यामध्ये कर्जाचा प्रकार कोणता आहे तो निवडावा. तसेच आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती आणि अहवाल या फॉर्ममध्ये सादर करावा.
  • फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व सूचनांचे योग्य प्रकारे पालन करायचे आहे व आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जामध्ये अपलोड करायची आहेत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्मचा एप्लीकेशन नंबर Note करून ठेवा.
  • जेव्हा मुद्रा लोन योजनेचा अर्ज मंजूर होईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी कर्जानुसार आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा

धन्यवाद!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *