पाठीमागच्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या ही 1 लाख 25 हजार एवढी होती. या जागांसाठी प्रवेश घेण्यासाठी 21 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यावेळेस ही संख्या 24 लाखांवर जाणार आहे. म्हणजेच जागांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे.
खूप जास्त विद्यार्थी असल्यामुळे व जागा कमी असल्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश न आल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीसाठी विद्यार्थी तयार असतात. जे विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना नीटने आणखी दोन दिवस दिले होते. या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 23 लाख 81 हजार 933 होती. आता ती 24 लाखांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे.
सध्या स्थितीला 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर 4 शासकीय दंत महाविद्यालय आहेत. येत्या काही दिवसात यांची संख्या 32 होईल. यावेळेस राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांची आकडेवारी-
- वैद्यकीय ‘नीट’ चाळणी परिक्षेसाठी 24 लाख विद्यार्थी आहेत.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये 5,125 जागा आहेत.
- खाजगी वैद्यकीय महाविद्यालयया मध्ये 3,510 जागा आहेत.
- अभिमत विद्यापीठ मध्ये 2,510 जागा आहेत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.