राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केले होते. आत्तापर्यंत 85% शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. जे उर्वरित शेतकरी आहे त्यांचे अनुदान तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर जमा करण्यात येणार आहे, असे विभागाने संबंधित विभागाने सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 50 दिवसांचे दूध अनुदान जमा झाले आहे उर्वरित 10 दिवसांचे अनुदान हे देखील लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे. या अनुदानामुळे ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
11 जानेवारी ते 10 मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा व्हावा, त्यासाठी शासनाने 5 रुपये दूध अनुदान योजना सुरू केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास अडथळे येत होते. काही जिल्ह्यातील जे शेतकरी शेजारील जिल्ह्यात दूध संघांना दूध पुरवठा करत होते. त्यांची माहिती गोळा करून अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जात आहे.
एक ही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहून नये असा पशुसंवर्धन विभागाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रिया केली आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे जसे की पाणीटंचाई, चाराटंचाई या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.