आज आपण सदर लेखातून ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देते. आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत असतात, त्यामुळे ते शेतकरी पारंपारिक शेती करत असतात.
पारंपारिक शेती करताना त्यांना खूप कष्ट करावे लागत असते. त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे त्यांना पारंपारिक यंत्रांचाच वापर करावा लागतो. कारण यंत्र खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पूरेसे भांडवल नसते. म्हणून शासनाने या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याचे ठरवले आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.
सदर योजनेची माहिती-
ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच कृषी यंत्रणा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून अवजार मिळवण्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून जर एक यंत्र खरेदी केले तर पुढील 10 वर्ष या योजनेच्या माध्यमातून आपणास अनुदान दिले जात नाही.
शासन महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान देत होते, परंतु काही दिवसांपूर्वी ते अनुदान पोर्टल वरती उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जात नव्हता. परंतु आता हे अनुदान उपलब्ध करण्यात आलेले आहे. याबद्दलचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किती अनुदान दिले जाते-
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये किंवा 50% एवढे अनुदान दिले जाते व इतर अवजारे खरेदी करण्यासाठी देखील निश्चित केलेले अनुदान दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून 112 कोटी इतका निधी निश्चित करण्यात आलेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये हा निधी महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे व सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज भरू शकतात.
सदर योजनेच्या माध्यमातून कोण कोणत्या यंत्रांना अनुदान दिले जाते-
- ट्रॅक्टर
- पावर टिलर
- बैल चलित अवजारे
- मनुष्य चलित अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे
- स्वयंचलित यंत्रे
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
- अवजाराचे कोटेशन व तपासणी अहवाल
- जातीचा दाखला (अनुसूचित जाती व जमाती असल्यास)
- स्वयंघोषणा पत्र
- पूर्व संमती पत्र
सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा?-
महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करावा. तसेच आपण आपल्या जवळील सीएससी सेंटरमध्ये देखील जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.