आज आपण नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या शासनाच्या योजनेची माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. आपणास या योजनेच्या माध्यमातून म्हैस गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. परंतु जर आपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता नवीन स्वरूपात अर्ज प्रक्रिया करायची आहे. आज आपण सदर लेखातून याबद्दलची संपूर्ण माहिती, अर्ज कुठे करायचा, लाभ कसा मिळवायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
सदर योजनेची माहिती-
या योजनेला मागेल त्याला म्हैस गोठा अशा पद्धतीने देखील बोलले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जर आपण म्हैस गोठा वाढवला तर आपणास सरासरी 77 हजार 500 रुपये पर्यंत अनुदान दिले जात आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- 7/12 उतारा
- 8अ उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स
- दोन पासपोर्ट साईज फोटो
सदर योजनेसाठीचा अर्ज कसा करावा-
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपणास नव्याने अर्ज करायचा आहे.
- सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- नंतर त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून, आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत.
- हा अर्ज आपणास पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे द्यायचा आहे.
- गोठ्याला मंजुरी ही अर्ज दिल्याच्या नंतर महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळते.
- नंतर ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपणास गोठा बांधण्यासाठी सांगितले जाईल.
- त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आराखड्याप्रमाणे गोठा बांधायचा आहे.
- आपणास या योजनेचे अनुदान हे जॉब कार्ड खातेधारकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
- याबद्दलची अधिक माहिती जर आपणास हवी असेल तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
- या योजनेसाठी आपल्याला 100% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला मिळालेली रक्कम पुन्हा माघारी करण्याची गरज नाही.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now