कुक्कुटपालन योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून कुक्कुटपालन योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून केला जाणारा उद्योग आहे. तसेच बेरोजगार तरुणांना देखील हा व्यवसाय चालू करता येऊ शकतो. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यांमध्ये कुक्कुटपालन पालन योजना राबवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून जे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांची निवड ही 30% प्राधान्य देऊन करण्यात येणार आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबात एकच व्यक्तीला व्यक्तीला दिला जाणार आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • शपथपत्र

सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-

या योजनेचा अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभागांमध्ये जाऊन तेथून अर्ज घ्यावा. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज पशुसंवर्धन विभागांमध्ये जमा करावा.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *