बळीराजा कर्ज योजना माहिती 2024

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांना आता पीक कर्जाबरोबर बळीराजा कर्ज देखील मिळणार आहे. बळीराजा कर्ज हे शेतकऱ्यांना प्रति एकर 1.5 लाख प्रमाणे दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेची माहिती

आता आपण पीक कर्जाबरोबर बळीराजा कर्ज देखील मिळवू शकता. जर आपणास बळीराजा कर्ज पाहिजे असेल तर ते सध्याला मिळणे सुरू झाले आहे. आपल्याला एक एकरी 1.5 लाख प्रमाणे हे कर्ज दिले जाणार आहे.

याचबरोबर आपण पीक कर्ज देखील काढू शकता. पीक कर्ज हे आपल्याला 60 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत दिले जाणार आहे. म्हणजेच आपण एक एकर जमिनीवरती 2.5 लाख रुपये रक्कम एवढे कर्ज काढू शकतो.

सदर योजनेसाठीचे कर्जावरील व्याजदर किती?-

वार्षिक व्याजदर हे सदर कर्जासाठी सरासरी 8 ते 12 टक्के राहणार आहे.

सदर कर्जाची परतफेड कशी करावी?-

हे कर्ज घेतल्यानंतर परतफेड ही 5 ते 7 वर्ष कालावधीसाठी असणार आहे. म्हणजेच याचा वार्षिक हप्ता आपल्याला भरावा लागणार आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • विहित नमुन्यातील बळीराजा अर्ज
  • दोन जामीनदार
  • सातबारा  व 8 अ उतारा
  • पासपोर्ट साईज फोटो

सदर योजनेची अर्ज प्रक्रिया-

  • सर्वात अगोदर आपल्याजवळील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये जायचे आहे.
  • तेथे गेल्यावर त्यांच्याकडून बळीराजा कर्ज संदर्भात अर्ज करायचा आहे असे त्यांना सांगायचे आहे.
  • नंतर आपणास बँक किंवा सोसायटी यांच्याकडून बळीराजा कर्जासाठी फॉर्म भरुन आवश्यक ती कागदपत्रे जोडण्यासाठी सांगितले जाईल.
  • वरती दिलेली विहित नमुन्यातील कागदपत्रे व फॉर्म आपल्या बँक किंवा विकास सोसायटी यांच्याकडे द्यायचा आहे.
  • नंतर आपल्या सर्व कागदपत्रांची पाहणी होईल. आपल्या सातबारावर कोणता बोजा आहे की नाही हे देखील त्यात पाहिले जाईल.
  • त्यानंतरच तो अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल.
  • अर्ज सादर केल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सदर रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

जामिनदार संमती पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *