प्रधानमंत्री वाणी WiFi योजना 2024. केंद्र सरकार देणार स्वस्तात इंटरनेट.

आपले सरकार हे जनहितासाठी अनेक योजना राबवत असते, त्यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री वाणी WiFi योजना. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना अगदी माफक किमतीत इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

सदर योजनेची माहिती-

  • या योजनेच्या माध्यमातून Voucher स्वरूपात इंटरनेट Data दिला जाणार आहे. या योजनेचा फायदा जास्त करुन तरुणांना होणार आहे. ही योजना देशाला डिजिटल बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशभरात WiFi क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र शासनाने उचललेले मोठे पाऊल आहे. चांगली इंटरनेट सुविधाते ही कमी दरात पुरवण्याची हमी केंद्र शासन या योजनेच्या माध्यमातून देत आहे.
  • ही योजना सर्व ठिकाणी राबवली जाणार आहे, म्हणजेच गावात, खेड्यात, शहरात इत्यादी. या योजनेचा फायदा घेण्यासाठी एक WiFi Provider नियुक्त केला जाणार आहे. त्या WiFi Provider च्या  माध्यमातून Vouches मार्फत डाटा लोकांना दिला जाणार आहे. या इंटरनेटचा वापर आपण मोबाईल(Mobile), लॅपटॉप(Laptop), पीसी(PC) व इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस(Electronic Devices) साठी देखील करू शकतो.

सदर योजनेच्या मार्फत पैसे कसे कमवावे?-

  • या योजनेच्या माध्यमातून Shopkeeper तसेच इतर दुकानदार WiFi Provider बनून पैसे कमवू शकतात. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर Application Form Section मध्ये खाली माहिती दिलेली आहे.
  • तिथे जाऊन आपण WiFi Provider साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
  • पण जर तुम्हाला WiFi Provider व्हायचं असेल तर तुमच्याकडे दुकान असणे गरजेचे आहे.

सदर योजनेची पात्रता-

  • या योजनेचा लाभ इंटरनेट Provider च्या दुकानापासून 100 ते 200 मीटरच्या रेंजमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना घेता येऊ शकतो.
  • या योजनेच्या माध्यमातून कमी किमतीत जास्त स्पीड इंटरनेट डेटा नागरिकांना मिळतो.

सदर योजनेचे फायदे-

  • या योजनेच्या माध्यमातून कमी किमतीत जास्त चांगल्या प्रतीचे इंटरनेट डेटा प्रदान केला जातो.
  • या योजनेचा फायदा गरीब कुटुंबातील मुलांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी होणार आहे.
  • जे दुकानदार आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून व नागरिकांच्या माध्यमातून अधिक पैसे कमवतात येणार आहेत.
  • ज्या गावाखेड्यात, दुर्गम भागात इंटरनेट व्यवस्थित चालत नाही, तेथे या योजनेच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळते.

सदर योजनेच्या इंटरनेटची Price, Data डाटा आणि Plan Validity-

PlanDataValidity
Rs. 61 GB1 Day
Rs. 92 GB2 Days
Rs. 185 GB3 Days
Rs. 2520 GB7 Days
Rs. 4940 GB14 Days
Rs. 99100 GB30 Days

सदर योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्वात अगोदर तुम्हाला सरल संचार पोर्टल वर जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नंतर https://pmwani.gov.in/wani/app?ln=en या लिंक वर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती म्हणजे ई-मेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी टाकायचा आहे.
  • सर्वात शेवटी सबमिट बटन वर क्लिक करावे. सर्व सूचनांचे पालन करुन अर्ज सादर करावा.
  • या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला App Provider बनवले जाईल. PDOA Registration झाल्यावर तुम्ही तुमच्या Area मध्ये WiFi सुविधा प्रदान करू शकता.
  • जर तुम्हाला या योजनेच्या संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही  +91-80-25119898 या नंबर वर कॉल करू शकता. हा नंबर Customer Care चा आहे. तुम्ही त्यांना सर्व प्रश्न विचारू शकता. यामुळे तुम्हाला हा अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *