पी एम किसान मानधन योजना माहिती 2024

आज आपण पी एम किसान मानधन योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना शासनाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती आपले. आपले सरकार हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यातीलच ही एक योजना म्हणजे ‘किसान मानधन योजना’.

या योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. उतार वयात शेतकऱ्यांना शेती करणे कठीण जात असते, तेव्हा त्यांना आपले खर्च भागवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडू नये, म्हणून सरकारने किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून सामान्य सुरक्षा प्रदान करण्यात येते.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दरमहा 3000 रुपये देण्याची तरतूद केली आहे. जर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे.

शेतकऱ्याला या योजनेसाठी दरमहा किती रुपये भरावे लागणार आहेत?

  • जे शेतकरी 18 ते 40 वयोगटातील आहेत ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात. या योजनेचा भाग शेतकरी कितीही वयात बनू शकतो.
  • शेतकऱ्यास दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. नंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन म्हणून दिली जाते. जेणेकरून शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागू शकतो.

या योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना कसा होतो?

 या योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो. म्हणजेच जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक

सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • या योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • सर्वात अगोदर आपल्याला किसान मानधन योजनेच्या https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • यानंतर Click here to Apply या र्यायावर क्लिक करायचे आहे.
  • लॉगिन करून झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये सांगितलेली आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे.
  • नंतर जनरेट ओटीपी यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल. त्यानंतर तो OTP तुम्हाला टाकायचा आहे.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. त्यातील सर्व माहिती व्यवस्थित पडताळून पहा.
  • नंतर फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरा व बँकेची माहिती भरा.
  • ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट आउट काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला गरज पडल्यास ती कामी येऊ शकते.
  • जर तुम्हाला या योजनेसाठी स्वतः फॉर्म भरता येत नसेल, तर आपण आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन फॉर्म भरू शकता.

नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *