आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. वडीलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयांमध्ये आपल्या नावावर कशी करू शकतो, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.
कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्यात वाटणी पत्र करायचे असेल, तर भरपूर पैसा खर्च होत होता. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता .जमीन नावावर करण्यासाठी तलाठ्याला पैसे देण्याऐवजी आपण खालील प्रक्रियेचा अवलंब करू शकता. वडिलोपार्जित जमीन वाटप अथवा सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नोंद लावण्यासाठी तुम्हाला आता कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाच्या फेऱ्या घालण्याची गरज भासणार नाही.
शासनाने असे आदेश दिले आहेत की तुम्ही सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये कायदेशीर रित्या जमिनीचे वाटप करून देण्यात येईल. जरी आपणास कुटुंबातील जमिनीचे वाटप किंवा मयताच्या वारसदारांचे नाव सातबारा उताऱ्यावर लावायचे असेल तरी देखील आपण या पद्धतीचा अवलंब करू शकता.
शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ती जमीन वाटपासाठी म्हणजेच वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदाराकडे अर्ज सादर करता येऊ शकतो. म्हणजेच आता फक्त 100 रुपयांमध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आपल्या नावावर करता येऊ शकते.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

