लगेचच FASTag चे ई-केवायसी केले नाही तर दुप्पट टोल भरावा लागेल.

आता देशातील टोल नाक्यावरील लांबच लांब रांग बंद होणार आहे. देशात याच वर्षात सॅटेलाईट टोल वसुली यंत्रणा सुरू होत आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला हे काम करावे लागणार आहे. फास्टॅगचे ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

यावर्षी अनेक महामार्गावरील टोल नाके ह्टवले जाणार आहेत जसे की राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग इत्यादी. आता तुम्हाला टोल नाक्यावरील लांबच लांब रांगेत थांबण्याची देखील गरज पडणार नाही. केंद्र सरकार नवीन उपग्रहाद्वारे आता टोल वसुली यंत्रणा सुरू करणार आहे. म्हणूनच त्या अगोदर तुम्हाला फास्टॅगचे ई- केवायसी करून घ्यायचे आहे. त्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.

तीन वर्षापासून फास्टॅगचा वापर-

चारचाकी वाहनांसाठी देशात 15 फेब्रुवारी 2021 पासून फास्टॅग वापरणे सुरू करण्यात आले होते. नंतर इलेक्ट्रॉनिक टोल जमा करण्याला गती मिळाली. प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले.

परंतु अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरला जाऊ लागल्याने, आता ई-केवायसी करणे सुरू केले आहे. 31 मार्च त्याची अंतिम मुदत आहे. या अगोदर 29 फेब्रुवारी पर्यंत फास्टॅगचे ई- केवायसी पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु ती वाढवून सरकारने 31 मार्च केली होती.

जर आपण ई-केवायसी केले नाही तर काय होईल?-

ई-केवायसी केले नाहीत तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर जमा करावा लागेल. NHAI च्या फास्टॅग विभागात यासंबंधीच्या सूचना आणि इतर अपडेट आपणास माहिती करून घेता येतील. हा शासनाने निर्णय सिंगल फास्टॅगला प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे.

ई-केवायसी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-

  • तुमचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वाहन परवाना
  • पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड (यातील कोणताही एक पुरावा चालेल)

असे पटकन करा ई-केवायसी-

  • बँकेशी जोडलेल्या फास्टॅग वेबसाईटवर जावे.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करून लॉगिन करा.
  • नंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
  • त्यानंतर माय प्रोफाईलवर जाऊन केवायसी टॅब वर क्लिक करा.
  • त्यामध्ये पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  • अशाप्रकारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • fastag.ihmcl.com या साईटवर जाऊन फास्टॅग स्टेटस चेक करावे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *